नागपूर शहर: ट्रॅफिक जॅममुळे प्रवाशांचा उद्रेक; काटोल नाका चौकात संताप व्यक्त
भर उन्हात तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. नागपूरच्या काटोल नाका चौक परिसरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये संतापलेले प्रवासी ट्रॅफिक पोलिसांसोबत वाद घालताना दिसत आहेत.व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्याच्या एका बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांनी आरोप केला आहे की, एका बाजूला रस्ता पूर्णपणे रिकामा असतानाही केवळ काही 'व्हीआयपी' हालचालींसाठी किंवा नियोजनाअभावी सर्वसामान्यांना ताटकळत ठेवले जात आहे