पनवेल: कळंबोलीत हळदी समारंभात चोरीचा प्रयत्न
Panvel, Raigad | Apr 29, 2026 कळंबोली परिसरात एका हळदी समारंभादरम्यान घडलेल्या चोरीच्या प्रयत्नामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भर गर्दीत ३५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तब्बल १८ तोळ्यांचे सोन्याची गंठण हिसकावण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला. मात्र, उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा डाव फसला आणि त्याला घटनास्थळावरून पळ काढता आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोलीतील एका ठिकाणी हळदी समारंभ सुरू होता. या समारंभाला मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि पाहुण्यांची उपस्थिती होती.