नागपूर शहर: अजनी हद्दीत ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत कारवाई; बंदी असलेला तंबाखू जप्त, आरोपी अटक
'ऑपरेशन थंडर’ अंतर्गत अजनी पोलीस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ओमकार नगर भागात मोठी कारवाई केली. 'द केक झोन' दुकानासमोर दुचाकीवरून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या प्रमोद रामेश्वर तितरे ला रंगेहात अटक करण्यात आली आहे.आरोपीच्या ताब्यातून आणि घरावरील धाडीतून विमल, राजश्री, केपी अशा नामांकित ब्रँड्सचा एकूण ८५ किलो ७०३ ग्रॅम प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला. पोलिसांनी तंबाखू आणि दुचाकीसह एकूण २,०१,७८२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.