जालना: जालना मनपाची धडक कारवाई; रेल्वे स्टेशन रोडवरील 70 अनधिकृत टपर्या व गोकुळधाम सहकार कॉलनी परिसरातील 3 शेड हटविले
Jalna, Jalna | Sep 29, 2026 जालना शहर महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने रेल्वे स्टेशन रोड परिसर तसेच गोकुळधाम सहकार कॉलनी परिसरात विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण हटविले.