औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने दिनांक 8 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी साडेदहा वाजता बेरूळा शिवारात विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन पकडले यानंतर सदरील ट्रॅक्टर वाहन 4 लाख रुपये व वाळू किंमत 3000 रुपये असा मुद्देमाल जप्त करून वाहन औंढा पोलीस ठाणे येथे आणून लावण्यात आले यानंतर मंडळ अधिकारी आशा गीते यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक व मालक ज्याचे नाव गाव माहित नाही यांच्यावर औंढा पोलीस ठाण्यात दिनांक आठ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल केला