चिखलदरा तालुक्यातील चांदपूरा ग्रामपंचायत हद्दीत एका महिलेवर प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याची गंभीर घटना आज दुपारी २ वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिला व आरोपी विशाल बालकराम बेलसरे रा.चांदपुरा ता. चिखलदरा यांच्यात पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. त्यावरून पीडिता ही तिच्या स्वखुशीने आरोपीच्या घरी राहायला गेली.