भडगाव: तरुणाच्या खिशातून 9000 रुपये लांबवल्याची घटना भडगाव शहरातील बस स्थानकात घडली, महिलेची पोलिसात धाव,
तरुणाच्या खिशातून पैसे लांबवल्याची घटना भडगाव शहरातील बस स्थानकात आज दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे, एक महिला व तिचा तीस वर्षीय मुलगा भडगाव शहरात दवाखान्याच्या कामानिमित्त आले असता मुलाच्या पँटच्या खालील खिशात ठेवलेले सुमारे 9000 रुपये बस मध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी अचानक लांबविले, सदर घटना लक्षात येताच मुलासह मुलाच्या आईने रड बोंबल सुरू केली, उपचाराकामी उसनवारीने आणलेले पैसे लांबवल्यांचे महिला ओरडून व रडून सांगत होती,