नागपूर शहर: नागपुरात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ७ गोवंशिय जनावरे जप्त; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
28 मे ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम येथील लाल शाळेच्या मैदानात कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरतेने डांबून ठेवलेल्या ७ लहान-मोठ्या गोवंशिय जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस गस्तीवर असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी जनावरांना चारा-पाणी न देता अत्यंत गर्दीत बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी अंदाजे १,२०,००० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला असून, या जनावरांना गोरक्षण,