लातूर: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जाहीर प्रचारास १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुभा
Latur, Latur | Nov 28, 2025 राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जाहीर प्रचाराबाबत सुधारित सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या निवडणुकीचा जाहीर प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता जाहीर प्रचार बंद होईल. त्यानंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी, प्रसारणदेखील बंद होईल.