ठाणे: कोपरखैरणे भागामध्ये हुल्लडबाज तरुणांनी रहदारीच्या रस्त्यावर आडवे सोडले रॉकेट, अन.... व्हिडिओ झाला व्हायरल
Thane, Thane | Oct 22, 2025 नवी मुंबईच्या कोपरखैरणे विभागामध्ये अनोख्या पद्धतीने फटाके वाचून इतरांच्या जीवनाला धोका निर्माण केल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे हुल्लडबाज तरुणांनी रस्त्यावर इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने फटाके फोडले.अत्यंत रहदारीच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात येजा असताना देखील त्या ठिकाणी हातामध्ये फटाके घेऊन फेकणे, त्या ठिकाणी रस्त्यावर रॅकेट सोडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.