नागपूर शहर: मेयो रुग्णालयासमोर किरकोळ वादातून चाकूबाजी; तहसील पोलिसांकडून ४ आरोपींना अटक: अनिता मोरे सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी 2 जून ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेयो रुग्णालयासमोर, चंद्रलोक बिल्डिंगजवळ असलेल्या एका गॅरेजमध्ये किरकोळ वादातून चाकूबाजीची थरारक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत सर्वच्या सर्व चार आरोपींना रात्रीच अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिली आहे.