जालना: घनसावंगीतील थरारक घटना; दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या बापाची मुलानेच केली कुर्हाडीने हत्या
Jalna, Jalna | Apr 9, 2026 जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रुई गावात पोटच्या मुलानेच बापाची कुर्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवार दि. 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात मुलगा आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (वय 45) यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. माहिती मिळताच तीर्थपुरी पोलिसांनी भेट दिली.