कल्याण: मीनाताई ठाकरे स्मारक विटंबना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान
Kalyan, Thane | Sep 17, 2025 मुंबईच्या शिवाजी पार्क येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांचे स्मारक आहे. या स्मारकावर अज्ञातांनी रंग फेकून विटंबना केली आहे. या घटनेमुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सर्व स्तरावरून निषेध केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे,त्यांना अजिबात सोडले जाणार नाही. त्या समाजकंठकावर कठोर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली असे शिंदे म्हणाले.