अमरावती मार्डी रोडवर दोन चारचाकी मध्ये भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर जखमी अमरावती वरून मार्डी रोडकडे जाताना अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जवळून 1 किलोमीटर अंतरावर दोन भरधाव कारने एकमेकांना जोरदार धडक दिली यामध्ये 7 ते 8 जण गंभीर झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अल्टो गाडी क्रमांक mh 32 y 4691 आणि स्विफ्ट गाडी क्रमांक mh 04 dw 0972 असे दोन्ही गाडीचे नंबर असून दोन्ही कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.