नागपूर शहर: नागपुरात घरफोडी: लाखांचा ऐवज लंपास
25 जूनला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार कामठी रोडवरील स्वप्न निकेतन सोसायटीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करत २० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १७ हजार २४७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी घराला कुलूप लावून कामावर गेले असताना चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून हा प्रकार केला. याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.