समुद्रपूर: वानरचुवा येथे विष मुक्त आहार अभियानांतर्गत मगन संग्रहालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली किसान चावळी बैठक
गिरड मगन संग्रहालयाच्या वतीने विष मुक्त शेती अभियान हाती घेतले असून किसान चावळी शेतकरी बैठक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानअंतर्गत वानरचुवा गावात सोमवारी २२ एप्रिलला ४ वाजता किसान चावळी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे, प्रगतिशील शेतकरी चक्रधर भगत, विष्णू बाम्रणवाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विष मुक्त शेतपिक घेण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.