तालुक्यातील खोकरी येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी घटस्थापना, ग्रामसफाई,भजन,किर्तन आदी धार्मीक तथा सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी गावातून रामधून काढण्यात आली.यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेवटी महाप्रसादाच्या वितरणानंतर सदर सोहळ्याची सांगता करण्यात आली.