देऊळगाव राजा: सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त पोलिस विभागा तर्फे *रन वॉक फॉर युनिटी *उपक्रम देऊळगाव राजा शहरात राबविण्यात आला
देऊळगाव राजा -लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बुलढाणा पोलीस विभागा अंतर्गत देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने रन वॉक फॉर युनिटी हा उपक्रम दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळे दरम्यान राबविण्यात आला .श्री शिवाजी हायस्कूल पासून धावण्यास सुरुवात झाली . यामध्ये एचडीपीओ मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी ,माजी सैनिक ' पत्रकार, सेवानिवृत्त कर्मचारी , संघाचे स्वयमसेवक - विविध अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते