अलिबाग: रायगड जिल्ह्यातील २८ धरणक्षेत्रात ३८.२३ टक्के पाणीसाठा
Alibag, Raigad | Apr 17, 2026 रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रात ३८.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून सूर्य आग ओकत असल्याने पाणीसाठा घटण्याचा वेग वाढला आहे. अजूनही पाऊस सुरू होण्यासाठी दोन महिने शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. रायगड जिल्ह्यातील २८ धरणांनपैकी २० धरणात ५० टक्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणक्षेत्रात पाणीसाठ्याने तळ गाठला असून या धरण क्षेत्रात ० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील २ धरणात १० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.