नागपूर शहर: सावधान! घरासमोर उभी असलेली मोपेड गाठली; दागिन्यांची बॅग लंपास, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
शहरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, अत्रे ले-आउट परिसरातून भरदिवसा दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आहेर हे काही कामानिमित्त घराबाहेर जाण्यासाठी निघाले होते.