जालना: जालना मनपात स्वच्छता सभापती आणि रंजीत मगरे यांच्यात बाचाबाची
निविदेच्या विषयावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती; पोलिसांच
Jalna, Jalna | Sep 16, 2026 जालना महानगरपालिकेत स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल आणि महापौर वंदना मगरे यांचे चिरंजीव रंजीत मगरे यांच्यात बाचाबाची झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. निविदेच्या विषयावरून प्रतिक्रिया देताना हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडताच माजी आमदार कैलास गोरंट्याल तसेच नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच कदीम जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची माहिती घेतली असून