कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबर रोजी, निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली माहिती
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक 20 डिसेंबरलाच होणार असून सध्याचे असलेलेच उमेदवार निवडणुकीत राहणार आहेत. नव्याने कोणतेही अर्ज दाखल करता येणार नाहीत. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 10 डिसेंबर ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. 11 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली.