परळी: परळीच्या मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करताना मोबाईल चोरीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
Parli, Beed | Nov 5, 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ येथील कर्मचारी बाळासाहेब कांदे यांचा मोबाईल मोंढा मार्केट यार्डमधील हनुमान मंदिरासमोर भाजीपाला खरेदी करत असताना एका चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार गर्दीचा फायदा घेत केला असून, मोबाईल काढून नेणारा चोरटा सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. चोरट्याची ओळख कोणाला पटल्यास तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा परळी पोलिसात याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.