महागाव: तालुक्यातील काटखेडा जवळ दुचाकीची समोरासमोर धडक, तिघेजण गंभीर जखमी
पुसद ते महागाव रोडवरील महागाव तालुक्यातील काटखेडाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्या धडकेमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना दि.३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. काळी दौलत येथे राहणारे सतीश विष्णू राजगुरू वय ३२ वर्षे व ऋषिकेश राजू खंदारे वय २२ वर्षे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.दुसऱ्या दुचाकी वरील जखमीचे नाव कळू शकले नाही.