नागपूर शहर: दोन चार चाकी ची आमोरासमोर धडक,नागपूरच्या एकाचा मृत्यू, ४ गंभीर
दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. खडगाव रोड परिसरात हा अपघात झाला या भीषण अपघातात इरफान उल्लाह खान ५५ वर्षे, राहणार बंगाली पंजा, इतवारी यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहन स्वार इतर लोक गंभीर जखमी झाले आहे . मिळालेल्या माहितीनुसार झायलो आणि अर्टिगा कारमध्ये भीषण टक्कर झाली, ज्यात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.