नागपूर शहर: कामठी रोड उड्डाणपुलावरून उडी मारून अभियांत्रिकी विद्यार्थिनीची आत्महत्या : बाबुराव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 10 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार स्वामीनारायण इंजिनिअरिंग कॉलेजची १८ वर्षीय विद्यार्थिनी श्रीना आशिष गडपायले हिने कामठी रोडवरील उड्डाणपुलावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. स्थानिकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पाचपावली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. याबद्दलची अधिक माहिती.