लातूर: सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय – शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप
Latur, Latur | Nov 3, 2025 लातूर :-अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ३१ हजार कोटी रुपयांच्या मदतपॅकेजची घोषणा करून अध्यादेशही काढला. मात्र या मदतीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे हे सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करतंय, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला.दानवे आज लातूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना सांगितले की, जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही.