मोर्शी: धान फाउंडेशन च्या वतीने येवती येथे, महिला सक्षमीकरणाबाबत बैठक संपन्न
धान फाउंडेशनचे वतीने महिला सक्षमीकरण बाबत आज दिनांक 30 सप्टेंबरला दुपारी एक वाजता येवती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धाण फाउंडेशनचे दिल्ली येथून आलेले बी के सिंग यांनी महिला सशक्तिकरण व बचत गटाचे महत्व त्याचप्रमाणे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करून महिलांना उद्योजकतेकडे वळविण्याबाबत विशेष माहिती या बैठकीतून देण्यात आली. या बैठकीला अनिल दवणे सुयेस घोंगडे शुभम जुमळे, सुरेखा भानगे व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या