नागपूर शहर: हुडकेश्वरमध्ये किचनमध्ये शिरला अत्यंत विषारी मण्यार साप; सर्पमित्राने वाचविले प्राण
: हुडकेश्वर परिसरातील स्वागत नगर येथे राजेश गुप्ता यांच्या घरी मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास एक अत्यंत विषारी मण्यार साप आढळल्याने खळबळ उडाली. किचनमध्ये भाजीच्या टोपलीखाली हा साप लपून बसला होता.सौ. गुप्ता यांना हा साप रस्सा समजून उचलण्याचा प्रयत्न करताना सापाची हालचाल दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्याने कुटुंबीय सावध झाले.