नागपूर शहर: विधान परिषदेसाठी भाजपचे संजय भेंडे उमेदवार; सहकार क्षेत्राला बळकटी देणार
भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संजय भेंडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, भेंडे म्हणाले की, ४२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याचा माझा अनुभव आता सहकार क्षेत्रातील प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.