महाड: रायगड जिल्हा सुनील तटकरे यांच्या बापाचा नाही
हा जिल्हा सर्वसामान्य रायगड वासियांचा शिवसेना युवा नेते विकास गोगावले
Mahad, Raigad | Oct 11, 2025 रायगड जिल्हा हा सुनील तटकरे यांच्या बापाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे असं मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि शिवसेना युवा सेनेचे कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी तटकरेंवर लगावलाय. सुनील तटकरे यांचे मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील वाढते दौरे पाहता विकास गोगावले यांनी यावर टीका केली आहे.येत्या दिवाळीनंतर आमच्या शिवसैनिकां सहितआमचे देखील तिन्ही आमदार म्हसळा,श्रीवर्धन,तळा,रोहा परिसरात दौरा करणार आहेत त्यामुळे कोणी कोणाला अडवू शकणार नाही अस म्हणत त्यांनी तटकरेंना डिवचले.