लातूर: डिसेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
Latur, Latur | Nov 28, 2025 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु, सद्यस्थितीत जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजवणी सुरु असल्यामुळे १ डिसेंबर, २०२५ रोजी लोकशाही दिन स्थगित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.