हातकणंगले: अंबपमध्ये दिवसाढवळ्या पितळी बंब चोरीचा प्रयत्न; संशयित पळाले
अंबपमध्ये दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान पितळी बंब चोरीचा प्रयत्न झाला. संशयितांनी दुचाकी आणि बंब सोडून पळ काढला. अंबप परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.