नागपूर शहर: राहुल गांधींचा दावा म्हणजे 'मुंगेरीलालचे हसीन सपने'; देवेंद्र फडणवीसांचा टोला
पुढील एका वर्षात मोदी सरकार कोसळेल, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल गांधींचा हा दावा म्हणजे केवळ 'मुंगेरीलालचे हसीन सपने' आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे केली.