नागपूर शहर: सावधान! नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा, 18 एप्रिल ला सर्व शाळांना सुट्टी जाहीर,नागपूरकरांनो काळजी घ्या
नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शनिवारी 18 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा अनेक शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले. हवामान विभागाने 18 एप्रिल साठी नागपूर जिल्हाला येलो अलर्ट जारी केला आहे काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे.