लातूर : विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील एलआयसी कॉलनी, प्रगती नगर येथे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र क्र. १४ ची सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंटीवन ॲग्री लि.च्या संचालिका सौ.अदिती अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात आले होते.