प्राथमिक आरोग्य केंद्र कसबे सुकेणे, तालुका निफाड येथे "स्वस्थ नारी सशक्त परिवार "अभियान आणि मानव विकास कार्यक्रम राबविण्यात आले.
2.5k views | Nashik, Maharashtra | Sep 26, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र कसबे सुकेणे, तालुका निफाड येथे "स्वस्थ नारी सशक्त परिवार "अभियान मा. डॉ.हर्षल नेहाते सर, मा.सरपंच आनंदराव भंडारे तसेच डॉ.निलेश चव्हाण सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नवीन गरोदर माता, प्रसूती पश्चात माता, किशोर वयीन मुली, 0 ते 2 वर्षे बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, वजन उंची नुसार BMI, किशोर वयीन मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी, पोषण आहार, योगा, मानसिक आरोग्य, मासिक पाळी इत्यादी संदर्भात समुपदेशन केले व आयर्न, फॉलिक एसिड, कैल्शियम औषधी वाटप करण्यात आले. पोषण मिशन, स्तनपान, नियमित लसीकरण समुपदेशन करण्यात आले.