नागपूर शहर: विदर्भात सूर्याचा कोप! उष्णतेची लाट येण्याचा इशारा
विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. अपेक्षेप्रमाणे विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऱ्याने ४३ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. कडक उन्हामुळे दुपारी रस्ते ओस पडू लागले असून, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. याबद्दलची सविस्तर माहिती डॉ.श्रीकांत टी. एस.हवामान विभाग शास्त्रज्ञ यांनी दिली आहे.