नागपूर शहर: पायदळ जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक : हरेश काळसेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 24 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास घरी पायदळ जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त होताच मानकापुर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. याबद्दलचा अधिक तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.