अमरावतीत भाजप–शिंदे शिवसेना युतीवर निर्णायक बैठक; जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता सलग सात बैठकीनंतरही तोडगा नाही; ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये नवी फेरी सुरू अमरावतीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे युती आणि जागावाटपाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. शहरातील ग्रँड मैफिल या हॉटेलमध्ये आज या महत्त्वपूर्ण बैठकीची नवी फेरी सुरू झाली. या बैठकीस शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय राठोड तसेच कॅप्टन अभिजीत अडसूळ उपस्थित होते. तर भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे हे होते.