जालना: शेरोशायरीत दिलासा, कृतीत विश्वास; कैलास गोरंट्याल यांचा कॉलनीवासीयांना शब्द; सोरटी नगर,मयुरी पार्क, कॉलनीत पायी पाहणी
Jalna, Jalna | Jul 10, 2026 राजकारणात आश्वासने अनेक दिली जातात; मात्र काही नेते थेट नागरिकांच्या दारात पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि जागेवरच त्या सोडविण्यासाठी यंत्रणा कामाला लावतात. जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर मार्गावरील महिंद्रा शोरूमलगतच्या सोरटी नगर, मयुरी पार्क, कृष्णबन कॉलनीसह परिसरातील नागरी समस्यांनी टोक गाठल्यानंतर गुरुवारी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. शुक्रवार दि.10 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता ही माहिती मिळाली.