नागपूर शहर: नागपुरात ‘सेंट्रल सायंटिफिक कंपनी’ला भीषण आग; ८० लाखांचे नुकसान
नागपुरातील ‘सेंट्रल सायंटिफिक कंपनी’च्या प्रयोगशाळेला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.दुपारी १२:२१ वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन केंद्राला मिळाली.