कल्याण: उधारीवर सिगारेट न दिल्याच्या रागातून नशेखोराने शिवीगाळ करत केली दुकानाची तोडफोड,घटनेचा व्हिडिओ आला समोर
Kalyan, Thane | Oct 24, 2025 कल्याणच्या अडवली परिसरामध्ये एका नशेखोराने दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. उधारीवर सिगारेट मागितली असता दुकानदाराने उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्यामुळे राग आलेल्या नशेखोराने रागाच्या भरात दुकानदाराला शिवीगाळ करत दुकानातील वस्तूंची तोडफोड केली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरा चित्रीत झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.