नागपूर शहर: बजाजनगर पोलिसांची मोठी कारवाई: ६ टन प्रतिबंधित ‘मांगुर’ मासा जप्त, करण्यात आले नष्ट
आरोग्य आणि पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित **'मांगुर' (कैटफिश)** माशांची तस्करी रोखण्यात बजाजनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी आणि अनोखी कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे **६ टन** वजनाचा मांगुर माशांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ते मासे नष्ट करण्यात आले आहे.