दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री इंद्रनील नाईक हे सोनी गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता विविध सेवा सहकारी संघटनेमार्फत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. या आशयाचे निवेदन सेवा सहकारी संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी सेवा सहकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डोमाजी बोपचे, डॉ. योगेश हरीणखेडे आदी उपस्थित होते.