नागपूर शहर: प्रेस क्लबसमोर ई-बसचा थरार; कारला जोरदार धडक,सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
शहरात वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या धडकेमुळे दोन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना नागपूर प्रेस क्लबसमोर घडली आहे. या भीषण अपघाताचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, कार मालक दुबे हे आपली कार नागपूर प्रेस क्लबच्या परिसरातून बाहेर काढत होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या ई-बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.