औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथील वसंत चतरू राठोड यांच्या घरास दिनांक 15 नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत घरात ठेवलेले नगद पाच लाख रुपये व धान्य, सोयाबीन,कपडे सह इतर संसार उपयोगी साहित्य जळून दोन लाख असे एकूण सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले.घरास आग लागली तेव्हा कुटुंब शेतात होते आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी शेतकऱ्यास माहिती देत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीत सर्व जळून खाक झाले