नागपूर शहर: स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न; संचालक अटकेत : हरेश काळसेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 20 एप्रिल ला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर येथील 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी' या स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या संस्थेचा संचालक रियाज फाजील काजी याला अटक केली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.