घनसावंगी: ग्रामीण भागात कुरड्या-पापडांचा हंगाम तेजीत; महिलांची लगबग शिगेला
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्याची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली असून कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत असतानाच, याच उन्हाचा योग्य उपयोग करत ग्रामीण भागातील महिलांनी पारंपरिक कुरड्या, पापड, वड्या आणि शेवया तयार करण्याच्या कामाला वेग दिला आहे. परिणामी, गावागावांत सध्या या कामांची लगबग शिगेला पोहोचली आहे.सध्या प्रत्येक गावात घरगुती खाद्यपदार्थ तयार करण्याचा हंगाम सुरू असून गल्लीतील महिला एकत्र येत एकमेकींच्या सहकार्याने