'राष्ट्रीय पोषण माह'चा उपजिल्हा रुग्णालय, कारंजा लाड येथे शुभारंभ
737 views | Karanja, Washim | Sep 23, 2025 वाशिम (दि.१२, सप्टेंबर): SDH कारंजा लाड येथे राष्ट्रीय पोषण माहाचा शुभारंभ डॉ. साळुंखे (MS) यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आहारतज्ञ श्रीम.पांडे यांनी पोषण व आहार यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. उपाध्ये यांनी लहान मुलांच्या आरोग्य विषयक उपाययोजनांवर माहिती दिली.कार्यक्रमाला रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी भोयर, परिसेविका ठाकरे, गायकवाड, भुसारी, डॉ. राठोड (दंतचिकित्सक), क्ष किरण अधिकारी श्रीम. बागुल, श्रीम.विल्यम, रक्तपेढी अधिकारी वासनिक, प्रयोगशाळा अधिकारी दाबेराव समुपदेशक हरणे, HA जाधव, MPW थोतांगे, ब्रदर कोल्हे, वानखेडे यांची उपस्थित होती